यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाचे लाभ मिळवून द्या*

80

भाजप तालुका महामंत्री माधव कासर्लावार यांची कॅबीनेट मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

      *सिरोंचा..सिरोंचा तालुक्यातील पन्नास टक्के भोई -ढिवर समाज बांधवांची वास्तव्य असून अत्यंत गरीब समाज असून या समाजांना आजपर्यंत घरकुलाचे लाभ मिळाले नसल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाचे लाभ मिळवून देण्याची मागणी भाजपचे तालुका महामंत्री माधव कासर्लावार यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

          राज्याचे मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात,जुलै ते ऑगष्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे भोई- ढिवर समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून या समाजातील गरीब व गरजूंना घरकुलाचे नितांत आवश्यकता असल्याने राज्यसरकार कडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाचे लाभ मिळवून देण्याची मागणी कासर्लावार यांनी केली आहे.