**अहेरी नगर पंचायत च्या काही प्रभागात पाण्याची भीषण परिस्थिती*

76

प्रभाग क्र. 14, 16 व 17 मुरूम खदान गडअहेरी, गडबामणी व चेरपल्ली या प्रभागात पिण्याचे पाणी टँकरणे पुरवठा करणे बाबत व वरील प्रभागासाठी स्वतंत्र पाणी टाकी मंजुर करणे बाबत.
 प्रभाग क्र. 16 व 17 गडअहेरी, गडबामणी व चेरपल्ली या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा होत होता. परंतु रोज काही ना काही बिघाडाचे कारण सांगून पाणी पुरवठा विभागा मार्फत पाणी सोडल्या जात नाही. त्यामुळे प्रभाग क्र. 16 व 17 तील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तिन कि.मी. अंतरावर पाय-पिट करून पाणी आणावे लागत आहे.

“तसेच प्रभाग क्र. 14 मुरूम खदान व प्रभाग क्र. 16 व 17 गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली गाव नगर पंचायत क्षेत्रात येत असुन येथे पाणी पुरवठा करण्याची सोय करणे हे नगर पंचायतीचे कर्तव्य आहे. गावातील बोअरवेल ला मुबलक प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याकरीता वरील प्रभागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
करीता नगर पंचायत, अहेरी मार्फत वरील प्रभागाकरीता पाण्याची टाकीची सोयकरून देण्यात यावी व पाणी टाकीचे सोय होई पर्यंत टँकर व्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात यावा. वरील प्रभागामध्ये तिन दिवसाच्या आत टँकरणे पाणी पुरवठा न केल्यास घाघर मोर्चा काढून प्रशासनाचा लक्ष वेधण्यात येईल. दि 21-11-22 पर्यत टँकरने पाणी पुरवठा सुरु न केल्यास 
दि. 22-11-2022 ला सकाळी 11.00 वाजता मोर्चा काढण्यात येईल.
टीप: नगर अध्यक्षा ज्या प्रभागातून नेतृत्व करतात त्याच प्रभागात पाण्याची भीषण समस्या
 👉अर्जदार
प्रभाग क्र. 14, 16 व 17 येथील नागरिक
प्रतीलिपीत या अधिकाऱ्यांना सुद्धा दिले निवेदन :- 1) मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, अहेरी यांना माहितीस सविनय सादर. 
2) मा. पोलीस निरिक्षक साहेब, पोलीस स्टेशन, अहेरी यांना माहितीस सविनय सादर 
यावेळी उपस्थित नगर सेवक अमोल मुक्कावार, राहुल दुर्गे , पंकज दहागावकर, प्रभाकर कुसराम , अक्षय आत्राम व इतर प्रभागातील प्रमुख लोक  उपस्थितीत होते.