विकास भूमिपूजन भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते
सिरोंचा: तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत संबोधले जाणारी तसेच राजकारण चालणारी गावं म्हणजे अंकीसा अश्या या ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने या ग्रामपंचायतसाठी अतिक परिश्रम घेऊन त्याच प्रमाणे गावाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने सन्मानीय माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम यांनी स्थानिक आमदार निधी व 30/54 आणि 25/15 या योजनेतुन जास्तीत जास्त निधी खेचून आणल्या.या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हापरिषद माजी अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताईंच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी न.प.सिरोंचाचे माजी नगरसेवक श्री.रवीभाऊ राल्लाबंडीवार,युवाकार्यकर्ते व समाजसेवक चेतनराव व्यासनेनी,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मोडेम सत्यम,समितीचे माजी सदस्य शानकोंडा प्रभाकर,वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनय्या मादेशी,जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर मोलगुरी,जेष्ठ कार्यकर्ते व ठेकेदार श्री.सत्यनारायण चिलकामारी,ग्रा.प.सदस्य कार्तिक जणगाम,गावकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.







