*गडचिरोली जिल्हा व तालुक्यातील गावो गावी पुन्हा आणणार कोट्यावधी रुपयांचा निधी*

44

. डॉ. देवरावजी होळी

मौजा, अडपल्ली, गोगाव, महादवाडी, नवरगाव व पोर्ला ता.गडचीरोली येथील विविध विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन

दिनांक २०/११/२०२२

गडचिरोली तालुक्यातील गावागावात मोठया प्रमाणावर विकास कामे सुरू झालेली असून आतपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता राज्यात आपलेच सरकार असल्याने पुन्हा गडचिरोली तालुक्यातील गावांना पुन्हा कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरु असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली, गोगाव, महादवाडी, नवरगाव , पोर्ला येथील भूमिपूजन प्रसंगी दिली

यावेळी उपस्थित श्री. मारोतराव इचोडकर प स माजी सभापती ,श्री. विलासजी दशमुखे माजी उपसभापती, चामोर्शी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. दिलीपजी चलाख , बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा , हेमंत बोरकुटे तालुका महामंत्री प्रल्हादजी म्हशाखेत्री , नवरगाव येथील सरपंच सुनंदाताई देशमुख उमाकांत चुधरी राजू थोरात सचिन बोकडे नेमाजी चौधरी तथा गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली विधानसभा आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांची रस्ते, नाली, सभामंडप, समाजमंदिर, वाचनालय, ग्रंथालय, सौंदर्यीकरण, इत्यादी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून यापुढेही असेच सुरू राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला