आमदार कृष्णा गजबे यांनी केले भूमिपूजन
कुरखेडा शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कुरखेडा शहरातील वीजपुरवठाची समस्या कायमची दूर करण्यासाठी कुरखेडा येथिल भाजपाच्या शिस्ट मंडळाने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या कडे कुरखेडा शहरातील विद्युत समस्या संदर्भात माहिती दिली असता आमदार कृष्णा यानी शहरातील विद्युत पुरवठा संदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये कुरखेडा शहरातील विद्युत समस्या संदर्भात महावितरण कंपनीकडे प्रस्ताव सादर केला व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पत्र देत जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून कुरखेडा शहरातील 12 नवीन ट्रान्सफर लावण्याकरिता नीती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती , या मागणीची दखल घेत जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना पत्र दिले व त्यांना ट्रान्सफॉर्म करिता निधी प्रस्तावित करिता आवश्यक ती कारवाई करावी असे सुद्धा सुचवले होते यांची दखल घेत आज कुरखेडा शहरात 12 नवीन ट्रान्सफर ची मागणी आता पूर्ण झाली असून कुरखेडा शहरात विविध ठिकाणी बारा नवीन ट्रान्सफर लागण्याला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि त्याचे आज डॉ.महेंद्र कुमार मोहबसी यांच्या इंडियन पेट्रोल पंपा जवळ आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन सुद्धा करण्यात आले. यावेळी कुरखेडा नगरपंचायत चे भाजप गट नेते तथा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी विद्युत समस्या दूर करण्याकरिता केलेल्या पाठपुरावाला यश आल्याने त्याने सुद्धा आमदार कृष्णा गजबे यांची विशेष आभार मानले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव भाऊ फाये, भाजपाचे वरिष्ठ नेते गणपत सोनकुसरे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र गोटेफोडे ,कुरखेडा नगरपंचायतचे आणि पुरवठा सभापती एडवोकेट उमेश वालदे ,कुरखेडा नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष डॉ महेंद्र कुमार मोहबन्सी , विद्युत उपकार्यकारी अभियंता मुरकुठे साहेब, नगरसेवक सागर निरंकारी, विलास गावंडे , नगरसेवक अशोक कंगाली भाजयूमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर , उल्हास देशमुख पुष्पराज राहांगडाले, उपस्थित होते.