मरपली येतील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचं पाणी.

42

जि.प.माजी अध्यक्ष  श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते टाकीच्या भूमिपूजन.

मरपल्ली: अहेरी तालुक्यातील मरपली येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली.सदर विहीर व टाकीच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.मरपली येते गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द  पिण्याचं पाणी मिळत नव्हता,गेल्या पंचहत्तर वर्षापासून या भागातून निवडुन आलेले लोकप्रतिनिधि कडे अनेकदा मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण केले नाही.मात्र जि.प.अध्यक्ष यांच्या कडे नवीन विहीर व टाकी साठी मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागातून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन सम्पन्न झाली असून करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.या भूमिपूजन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी पंचायत समिती सदस्या सौ.शारदा कोरेत,माजी सरपंच सीताबाई वेलादी,ग्राम पंचायत सदस्या सुनंदा आत्राम,आनंदराव कोंडागुर्ले,माजी सरपंच श्री.हनमंतू कोरेत,माजी उपसरपंच श्री.कार्तिक तोगम,प्रतिष्ठित नागरिक निलेश कूड़मेथे,बापू बेडकी,व्येंकटी कोंडागूर्ले,लचया सिडाम,शंकर कोंडागूर्ले,अशोक दिकोंडा,वासुदेव कोंडागुर्ले,श्रावण कोंडागुर्ले, वेंकटी कुमरे,मल्लेश कंनेबोईना,अमोल कोंडा,मोरेश्वर कोंडगुरले,श्रीनिवास मडावी,नानाजी.कोंडागुर्ले ,केशव, गजा नन मुंजम,दिगु पेरगु,व गावातील नागरिक उपस्थित होते.