बजेटमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते- पुल विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या

50

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांना संयुक्त निवेदन*

गडचिरोली :जिल्ह्यातील दुर्गम अति दुर्गम भागातील रस्ते व पूलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची केली विनंती*

*दिनांक २८/११/२०२२ गडचिरोली*

*गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अति दुर्गम भागात रस्त्यांची पुलांची अत्यंत आवश्यकता असून येणाऱ्या बजेटमध्ये त्याकरिता निधी  उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी   व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री रवींद्रजी चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली यावेळी भाजपाचे जिल्ह्याचे नेते अरुणभाऊ हरडे, प्रामुख्याने उपस्थित होते.*

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी निधी मेळावा याकरता मागील काही दिवसात आमदार डॉक्टर देवरावजी होळी हे सातत्याने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या भेटीला जात असून जिल्ह्यातील  अजूनपर्यंत न  झालेल्या रस्त्यांसाठी व लहान नद्या ,लहान नाल्यांवरील पुलांसाठी  अधिकाधिक निधी मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आमदार कृष्णाजी गजबे व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्ह्यातील या रस्ते पूलांच्या समस्यांबाबत संयुक्तपणे निवेदन देऊन मंत्री महोदयांना जिल्ह्यातील या रस्ते व पूलांसाठी अधिकाधिक निधी येणाऱ्या  बजेटमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी विनंती  केली.*