बापरे बाप आला रे आला वाघ आला कमलापूर व लिंगमपल्ली परीसरातील

44

कमलापूर :काल रेपणपल्ली आणि कमलापुर रस्त्यात वाघ दिसल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कमालापुर येथे वाघाने दुचाकीवर  यात दुचाकीवर असलेले दोघे थोडक्यात बचावले. ही घटना दुपारी दोन वाजता च्या दरम्यान ची आहे. 
कमलपुर ला लागून काही घरे असलेला एक टोला आहे. Modumadgu असे या टोल्याचे नाव आहे. या टोल्याच्या रस्त्याने कमालपुर येथिल सुधीर रंगुवार आणि त्याचा मित्र दोघे दुचाकीने येत होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाने त्यांच्यावर उडी घेऊन हल्ला केला. वाघाचा पंजा दुचाकी चया डिक्की ला लागला. सुधीर ने दुचाकीचा वेग वाढविल्याने दोघे कसेबसे बचावले. 
सदर घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी कमलापूर् यांना देण्यात आली. 
वन विभाग च्या कर्मचारी वर्गाने घटना स्थळ ला भेट दिली असता तेथे वाघाचे पंजे आढळले. 
या घटनेने कमलापुर् परिसरात दहशत निर्माण झाली आहे.