जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चा विद्यार्थी कु. दीप उरकुडे प्रथम.

61

ब्रह्मपुरी :- क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत दिनांक २९/१/२०२२ ला चंद्रपूर येथे झालेल्या १४ वर्षाआतील मुलांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चा विद्यार्थी कु.दीप हेमंत उरकुडे याने ५० मीटर  Free style प्रकारात ५५ सेकंद वेळ दिली तर ५० मीटर Butterfly  प्रकारात ६० सेकंद वेळ आणि  ५० मीटर Breath strok प्रकारात 60 सेकंद वेळ नोंदवून तिन्ही प्रकारच्या जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक  पटकवून आपले स्थान विभागीय स्पर्धेसाठी निश्चित करत ब्रह्मपुरी शहराचं नाव जिल्ह्यात उज्वल केले त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे आपल्या यशाचे श्रेय त्याने आई वडील व आपल्या शिक्षकांना दिले.