एकरा येथे आदिवासी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न

43

बैठकीला माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

          बैठकीत तोडसा ग्राम पंचायतच्या निवडणूक संदर्भात चर्चा

एटापल्ली :तालुक्यातील एकरा येथे  आदिवासी विद्यार्थी संघाची बैठक पार पडली.या बैठकीला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम व  आविस युवा नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         या बैठकीत तोडसा ग्राम पंचायतींच्या निवडणूक संदर्भात कार्यकर्ते व गावकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.यावेळी तोडसा ग्राम पंचायत मध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्याविषयी चर्चा करण्यात आली.आविस नेत्यांसमोर बैठकीला उपस्तीत गावकरी व कार्यकर्त्यांनी यावेळी तोडसा ग्राम पंचायतमध्ये बदल घडवून   आणण्याचे विश्वास व्यक्त केले.
      या बैठकीला आविस तालूकाअध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी ,आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी प.स.सदस्य मंगेश हलामी,माजी प.स.सदस्य संगीता दुर्वा,माजी सरपंच मुन्नीताई दुर्वा,ज्ञानेश गावडे,सुमित्रा गावडे,कन्ना नरोटे,सुधाकर नरोटे,माजी सरपंच साधू गावडे,कोकण सरकार,माजी उपसरपंच भिवा मडावी,प्रज्वल नागुलवार,जुलेख शेख सह आविस पदाधिकारी व ग्राम पंचायत क्षेत्रातील गावकरी उपस्थित होते.