आलापल्ली:येनापुर येथील भगवान संगावार हे ४५ टक्के अपंग आहेत त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना कामाची अत्यंत गरज होती व ते आपले सर्व कागदपत्रे घेऊन आलापल्ली येथील टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय येथे येऊन आपले अपंग प्रमाणपत्र दाखवून मदत मागितले असता टायगर ग्रुप आलापल्ली चे उपाध्यक्ष श्रीकांत जल्लेवार यांनी सदर माहिती लॉयाड्स मेटल्स कंपनीचे अधिकारी विनोद कुमार सर यांना दिले असता अपंग व्यक्तीला रोजगार देणे हे आमचे कर्तव्य आहे असे बोलून त्यांनी लगेच होकार दिला त्या व्यक्तीला लॉयाड्स मेटल्स कंपनी मध्ये अधिकृत कामकाज साठी नियुक्त करण्यात आले त्यांना त्याप्रकरची ट्रेनिंग देऊन काम देणार असल्याचे सांगितले या वेळी उपस्थित टायगर ग्रुप आलापल्ली सदस्यांनी लॉयाडस मेटल्स कंपनीचे अधिकारी श्री विनोद कुमार सर व संबंधित सर्व कर्मचारींचे आभार मानले.