कुऱ्हा महोत्सव-२०२३” चे पालकत्व राजेश वानखडे यांचे कडे

59

कुऱ्हा –
शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयातर्फे पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असलेल्या “माझं गाव माझा उत्सव कुऱ्हा महोत्सव-२०२३ चे भव्य आयोजन दरवर्षी केल्या जाते. गेल्या दहा वर्षाची अखंडपणे चालणारी परंपरा अबाधित ठेवत यावर्षी महोत्सवाचे आयोजन दिनांक 20 ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून पालकत्व  राजेश वानखडे यांनी स्वीकारले. तसेच यावर्षीच्या कुऱ्हा महोत्सव उत्सव समिती 2023 चे अध्यक्ष म्हणून तरुण तडफदार व्यक्तिमत्व  नितीन धांडे यांची उत्सव समिती अध्यक्ष तसेच महिला अध्यक्ष म्हणून सौ. संगीताताई पवार यांची उत्सव समिती महिला अध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली. 
कुऱ्हा महोत्सव २०२३ चे स्वागताध्यक्ष  राजेश वानखडे व उत्सव समिती अध्यक्ष  नितीन धांडे व महिला अध्यक्षा सौ. संगीताताई पवार यांचे वाचनालयाचे अध्यक्ष  विवेक बींड, सचिव  अमोल भागवत सर्व संचालक व गावातील महोत्सव प्रेमी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.