ठाकूरदेव जत्रेत समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून जत्रातील जनतेला संबोधित केले.डाॅ नामदेव उसेंडी

59

एटापल्ली :तालुक्यातील सुरजागड येथे दरवर्षी ओअदलपेन ठाकूरदेव जत्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. जत्रेत समारोपीय  कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून जत्रातील जनतेला संबोधित केले.
     गडचिरोली जिल्हा हा पर्यावरण व निसर्गाने नटलेला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज संपती सुध्दा आहे. या खनिज संपत्तीवर डोळा ठेऊन ठेऊन शासन व भांडवलदार या खनिज संपत्तीची लूट करण्याचा बेताद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल, जैवविविधता व त्याभागात राहणाऱ्या आदिवासीं व गैरआदिवासी यांची जमीन, संस्कृती व परंपरा उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. मुळात गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी व गैरआदिवासी यांचे जगण्याचे साधन हे जंगलातील लघुवनोपज आहेत. खनिजांच्या उत्खननामध्ये या भागातील वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उध्वस्त होत आहे. एका बाजूला पर्यावरणाच्या ऱ्हास मुळे ग्लोबल वॉर्मिग वाढलेले असताना व ग्लोबल वॉर्मिगमुळे संपूर्ण पृथ्वीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण साबुत राखण्यासाठी मोठमोठी संमेलन व विचार मंथन सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात माञ मोठया प्रमाणात उध्वस्त करण्यात येत आहे. हा फार मोठा विरोधाभास असून, विकासासाठी पर्यावरण व आदिवासींचा विध्वंस करणे हे योग्य नाही.
   यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सैनु गोटा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल मारकवार, शेकापचे रामदास जराते, जयश्री जराते, नगरसेवक मनोहर बोरकर, लोकनाथ गावडे, संजय गावडे, शिलाताई गोटा, कन्ना गोटा, तानेंद्र लेकामी, विनायक वाडिवा सीईओ बांबू प्रकल्प गडचिरोली, प्रल्हाद म्हशाखेत्री, दत्ता करंगामी, पंकज खोबे आदी उपस्थित होते.