भोगणबोडी येथे ग्रामीण टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन

44

गडचिरोल्ली:क्रिकेट हा सांघिक एकतेतून विजय मिळवण्याचा खेळ असून या खेळातून सांघिक विजयाचे कौशल्य  विकसित होण्यास मदत मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भोगणबोडी येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.*

*रॉयल 9 स्ट्रायकर क्रिकेट क्लब भोगणबोडी यांच्या सौजन्याने ग्रामीण टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेट संघांनाच प्रवेश देण्यात आला आहे हे विशेष. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीप भाऊ चलाख, भाजपचे नेते पुरुषोत्तमजी बोरकुटे , क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी, यांचेसह  क्रीडा संघाचे सदस्य व क्रीडाप्रेमी  प्रामुख्याने उपस्थित होते.*