. सामाजिक युवा कार्यकर्ते श्री. विनोद मडावी
पोटेगाव :गडचिरोली तालुक्यातील
पोटेगाव परिसरातील भागात आजही मूलभूत समस्या आजही कायम असून परिणामी या परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत, शासन व प्रशासन बाबतीत मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांत असंतोष पसरलेले आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते यांसारख्या विविध मूलभूत समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी सामाजिक युवा कार्यकर्ते श्री. विनोद मडावी यांनी केली आहे ,
ग्रामपंचायत जामगाव मधील – नागवेली,कोरकुटी ,लेखटोला , ताडगुळा , ग्रामपंचायत मरदा येथील -जाल्लेर,तोहगाव,केलीगट्टा, ग्रामपंचायत देवापुर येथील तांडेवाही,खराडगुळा, माकडचुव्हा,बिटामटोला,देवदा, कळशी, ग्रामपंचायत सेवेला येथील – सुईमारा,कान्न्हाळगाव,कोसंघाट,गजानगुळा,कर्कझोरा, ग्रामपंचात राजोली येथील- गव्हाळहेटी, रमनगर, असे एकूण २० गावे आदिवासी बहुल असून देशाला स्वातंत्र्याचे ७५ वर्ष होऊनही, देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सदर आदिवासी भागात अद्यापही पायाभूत सुविधा नाहीत. रस्ते,पूल,शिक्षण,आरोग्य यादी सोई-सुविधेपासून वंचित आहेत, सदर भागात सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर माता, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, शाळेकरी तरूण-तरुणी, सुशिक्षित बेरोजगार यादिंना गैरसोय होत आहे, आपत्कालिन परिस्थितीत रुग्णास खाटेला २ बांबू बांधून रात्रौ-अहोरात्रो , मैलो-मैली दऱ्या खोऱ्यातून, घनदाट जंगलातून १० ते १५ कि.मि . आजही पायपीट करावे लागत आहे ….
शासन व प्रशासनाणी त्वरित सदर भागातील लोकांना न्याय मिळवून देण्यात यावे