आरमोरी – गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा सिनेटचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा व सदर सभागृहाला विर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करणार असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी प्रशासनाला दिला आहे.
आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाच्या सिनेटने आदिवासी क्रांतिकारक, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा जिल्ह्यातील जनतेचा मोठा अपमान आहे. हा चुकीचा घेतलेला प्रस्ताव तात्काळ रद्द करून सभागृहाला शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे. अन्यथा तिव्र आंदोलन करणार येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी प्रशासनाला दिला आहे.