भाग्यश्री ताई आत्राम यांची अहेरी रुग्णालयाला भेट

44

चींचगुंडी येथील प्रतिष्ठित नागरिक लिंगाजी पानेम यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस*

अहेरी: तालुक्यातील चिंचगुंडी येथील प्रतिष्ठित नागरिक लिंगाजी पानेम आपल्या शेतात काम करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी तत्काळ रुग्णालयात लिंगा पानेम यांची भेट घेऊन प्रकृती बाबत विचारणा केले.
एवढेच नव्हेतर येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून उपचाराबाबत माहिती जाणून घेऊन रुग्णाला काळजी न करता विश्रांती घेण्याचे आवाहन केले.वेळ प्रसंगी काहीही मदत लागल्यास सदैव आपल्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी दिले.