#BhagyashreeTai शांतीग्राम येथे हरे कृष्ण पुजा महानामयज्ञ कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती

105

मुलचेरा:- तालुक्यातील शांतीग्राम येथे 29 ते 30 जानेवारी पर्यंत हरे कृष्ण पूजा व महानाम यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम  यांनी उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अमित मुजुमदार, लगामचे सरपंच दीपक मडावी, येल्लाचे उपसरपंच दिवाकर उराडे, 
शांती ग्राम चे ग्रामपंचायत सदस्य सपन डे, उमेश बैरागी, सत्यजित रॉय, सुशांत बेपारी, मुकुल राय, राजा बेपारी, विधांशु बिश्वास, मिथुन अधिकारी, गौतम मित्र, सदन देबनाथ, संदीप मंडल, कृष्णा चौकीदार, रतन माझी, आशिष पोद्दार, सुशील विश्वास, उत्तम देबनाथ, प्रभास गाईन, सुजय मंडल आदी मान्यवर उपस्थित होते.
30 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी भाग्यश्री ताई आत्राम यांनी राधा-कृष्ण मंदिरात सुरू असलेल्या हरेकृष्ण व महानाम यज्ञ कार्यक्रमात उपस्थित राहून दर्शन घेतले. स्थानिक बंगाली बांधवांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला होता.ताईंचा आगमन होताच कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमात महिलांनी व युवतींनी यावेळी विविध धार्मिक नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.यावेळी भाग्यश्री ताईंकडून बक्षीस देण्यात आले.तर हरेकृष्ण आणि महानाम यज्ञ कमिटी ला ताईंनी आर्थिक मदतही केले.
या दोन दिवसीय हरेकृष्ण महानाम यज्ञ कार्यक्रमात भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी लगाम,शांतिग्राम, दामपूर,येला,परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.