प्रथम वाढदिवसानिमित्त बाळ “अगस्त्या” यास दिला शुभ आशीर्वाद
*सिरोंचा:-* तालुक्यातील नारायणपूर येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संपत दया यांच्या मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
राजे साहेब कार्यक्रमस्थळी पोहोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.फटाक्यांची आतषबाजी,ढोल-ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
शेतकरी कुटुंबाने केलेल्या सन्मानाबद्दल राजे साहेबांनी समाधान व्यक्त केले.त्यांनी दया कुटुंबाचे आभार मानत बाळ “अगस्त्या” ला शुभ आशीर्वाद दिले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव आत्राम भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनाथ राउत,जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी,जिल्हा सचिव संतोष पडलवार,अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष शाहरुख पठाण,जिल्हा महिला महामंत्री प्रीतीताई शंभरखर,तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चेम्मकारी,मालन्ना संगरती,रमेश इंगली,राजन्ना कडेकरी,अशोक इंगली,प्रशांत चेम्मकारी,शेखर एम्पली,राजन्ना इंगिली,वेंकटेश कडेकरी,अंजी कडेकरी,राजू तोबारा,वेणू श्रीकोंडा,नागराजू दया,श्रीनिवास चिलकामारी,राकेश येम्बरी,गगन पोलमपल्ली,यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.







