सिरोंचा : तालुक्यातील दुब्बापल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती कार्यक्रमानिमित्त शेकडो अनुयायांनी त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून त्यांना मानवंदना केले.
दुब्बापल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी जयंती कार्यक्रमाला उपस्थित शेकडो अनुयायांसाठी काँग्रेस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शेकडो अनुयायांनी अन्नदानाचे आस्वाद घेतल्या.कार्यक्रमाला शेकडो अनुयायी व महिला युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
दुब्बापल्ली येथे आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बाजार समितीचे संचालक आकूला मल्लिकार्जुन, तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी,काँग्रेसचे युवा नेते व माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लम, नगरसेवक मारोती गणपुरापू,पोचमपल्लीचे माजी उपसरपंच ललिता सल्ला,माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शानगोंडा,राष्ट्रवादी काँग्रेसचे संमय्या पांडवला,शंकर सल्ला, श्रीनिवास येलपूला आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून त्यांना मानवंदना केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कस्तृरी रमेश, नागराजू गोमासे, बेडके श्रीनिवास, बेडके भास्कर, संजीव गुंफुला,विष्णू मूड्मडगेला सह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.







