तडीपार बापाने व्याजाच्या धंद्यातून कमावली कोट्यावधिची माया? सीएमआर मिलींग घोटाळ्यातील मास्टरमाईंड असलेल्या लेकाने चढवला कळस

132

देसाईगंज,
गोंदिया जिल्ह्यातुन तडीपार केलेल्या बापाने देसाईगंज येथील एका कडधान्य व्याप्याराशी संवाद साधला. दरम्यान आरमोरी येथील एका व्याजाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला हाताशी धरून त्याचेकडून एक टक्के दराने व्याजाने पैसे घेऊन शहरातील गरजुंना ५ ते १० टक्के व्याजाने देऊन अल्पावधित कोट्याधिश बनला. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून लेकाने देखील बाजारात नकली नोटं चालवून व वर्तमान स्थितीत सिएमआर मिलींग मध्ये प्रचंड गैख्यवहार करून कोट्यावधिच्या संपत्तीवर कळस चढवला, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्जीत केलेल्या बेनामी संपत्तीची चौकशी होऊ नये, याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तडीपार असलेला बाप मुडचा गोंदियाचा असुन गोंदिया येथुन तडीपार करण्यात आल्याने देसाईगंज येथील एका कडधान्य व्यापाऱ्याच्या आसयाने राहु लागला होता. दरम्यान त्यांच्याच मुलीशी संसार थाटून तत्कालीन स्थितीत सुरु असलेल्या सलेल्या गोपाल सिनेमा टॉकीजमध्ये तिकीटांची काळेबाजारी करतांना अनेकदा रंगेहाथ पकडण्यात आला असल्याचे सांगीतले जात आहे. तत्कालीन स्थितीत एकवेळच्या खाण्याचे वांदे असतांना अनेक दानशूर व्यक्तींनी मदतही केल्याचे सांगीतले जात आहे. दरम्यान आरमोरी येथील एका व्याजाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाराशी संवाद साधून एक टक्के व्याजाने कर्ज घेऊन ५ ते १० टक्के व्याजाने रक्कम देऊन बदल्यात

कोरे चेक, प्रापर्टीचे दस्तावेज तसेच कोर्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेत होता.

अवैध सावकारीच्या धंद्यातुन काहिच वर्षात कोट्याधिश बनलेल्या तडीपार बापाने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करूनही इन्कम टॅक्स भरला की कसे? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान कडधान्याचा व्यापार करीत असतांना कडधान्य विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याला नकली नोट देऊन फसवणूक केल्याचे चव्हाट्यावर येताच सदर तडीपार व्यापाऱ्याने तात्काळ सारवासारव करून प्रकरण दाबुन टाकण्यात यश मिळवले होते.

दरम्यान शेरास शेर सव्वाशेर निघालेल्या लेकाने सिएमआर मिलींग मध्ये एन्ट्री मिळताच पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना हाताशी धरून सिएमआर मिलींग करणाऱ्या एक एक राईसमिलर्सला हेरून त्यांचे तांदळाचे लॉट या ना त्या कारणाने नापास करून संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत वेठीस धरणे सुरु केले. ज्या राईसमिलर्सनी सहकार्य करण्यास नकार दिला अशा राईसमिलर्सचे तांदुळ पकडून देऊन बदल्यात कोट्यावधी रुपये वसूल केले. जाचाला कंटाळलेल्या राईसमिलर्सनी उगीच त्रास नको म्हणून हातमिळवणी केली असता धान भरडाई करीता एक लॉट मिळवून देण्याचे ४५ हजार तर लॉट स्वीकृत करण्याचे ४५ हजार असे एकुण एका लॉट मागे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी ९० हजार कमाऊ लागला.

ही गंभीर बाब गडचिरोली जिल्ह्यात सिएमआर मिलींग करणाऱ्या राईसमिलर्सच्या निदर्शनास आल्यानंतर मोठा गौप्यस्फोट करण्यात आला होता. मात्र तोपर्यंत छोटा बागडबिल्ला या नावाने प्रकाशझोतात आलेल्या सिएमआर मिलींग घोटाळ्यातील मास्टरमाईडने मंत्रालयापर्यंत सुत जुळवून व स्थानिक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोन ट्रॅक करून प्रसंगी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून शासनाला मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा करून तडीपार बापाने कमावलेल्या कोट्यावधिच्या बेनामी संपत्तीवर कळस चढवला.

दरम्यान या विरोधात संसदेत आणि विधानसभेतही पडसाद उमटु लागले असता अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात माहिर असलेला छोटा बागडबिल्ला आता मात्र सत्ताधाऱ्यांच्या मागे लपत असुन केलेल्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असला, तरी ‘केलेची कर्म त्याचे प्रत्यय याच जन्मी भोगास येई’ही म्हण एक ना एक दिवस सार्थकी लागणारच असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गोरगरीबांच्या उत्थानासाठी सुरु असलेल्या या योजनेच्या माध्यमातून केवळ अमाप श्रीमंती मिळवता यावी म्हणून गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावून मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा बेधडक पुरवठा केल्या जात असतांना संबंधित विभागाचे अधिकारी देखील मानवता विसरले असल्याने याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.