मा.रविभाऊ नेलकुद्री यांनीही केले रक्तदान.
२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
आज भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष मा.रविभाऊ नेलकुद्री यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भव्य रक्तदान शिबीर मोठ्या थाटात संपन्न झाले. यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन तब्बल २५ रक्तदात्यांनी सहभाग घेवून सामाजिक बांधिलकी जपली.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,नर्स,कर्मचारी उपस्थित होते