#Bhayyashree Atramमोबाईल गेम पेक्षा मैदानी खेळ खेळा:माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

63

पिपली येथे ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामने

एटापल्ली:- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. मोबाईल गेम पेक्षा मैदानी खेळ हे जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते. शालेय स्पर्धा असो किंव्हा ग्रामीण भागात आयोजित विविध स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील चुणूक दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. 

आज क्रीडा क्षेत्रालाही ग्लोबलायझेशन प्राप्त झालाय. त्यामुळे खेळातही करिअर करता येऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीने स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले.एटापल्ली तालुक्यातील पिपली येथे एकलव्य क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते

.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जवेली (खुर्द) पिपलीचे सरपंच मुन्ना बोन्झाजी पुंगाटी तर,प्रमुख पाहुणे म्हणून पिपली चे गाव पाटील सैनुजी लेकामी,गाव भूमिया डुंगा लेकामी, माजी सरपंच नामदेव लेकामी,बाबुराव नरोटे,लक्ष्मण लेकामी,पेका लेकामी,सरपंच राजू लेकामी,जितेंद्र टिकले,मोहन मट्टामी,लक्ष्मण नरोटे,नगरसेविका निर्मला हिचामी,संभाजी हिचामी,बेबीताई नरोटे,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून शालेय जीवनापासूनच आदिवासी विद्यार्थी विविध खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील कुठलीही स्पर्धा असो आदिवासी उत्तम खेळ दाखवतात. एटापल्ली,भामरागड तालुक्यातील बरेच खेळाडू वरिष्ठ पातळीवर चमकलेले आहेत.ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गावात प्रवेश होताच गावकऱ्यांकडून मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून स्पर्धेचे रीतसर उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उद्घाटनिय सामन्याचा आनंद लुटला.