#Armori#महादेव पहाडीवर दोनशेच्या वरुण नागरीकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

41

आरमोरी तालुक्यातील महादेवगड पहाडी पळसगाव अरततोंडी येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा व भागवत सप्ताह निमित्त स्वर्गीय त्र्यंबकजी पाटील बुद्धे व स्वर्गीय तुळशीरामजी चवारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चवारे क्लिनिक देसाईगंज व ग्रामपंचायत डोंगरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वनपरिक्षेत्र
 अधिकारी लोंढे यांनी केले. यात जवळ दोनशेच्या वरुण नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव पहाडी देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम,  ग्रामपंचायत डोंगरगाव उपसरपंचा वनमालाताई पुस्तोडे, श्रीराम ठाकरे,गणेश मातेरे,श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ घोडाम,हेमचंद्र ढोरे,रामजी मानकर,कवळुजी मातेरे,रेवनाथ चव्हारे,दुर्वास नाईक,अशोक भोयर आदि मान्यवर उपस्थित होते.
यात विविध आजारांच्या शुगर, स्त्रीरोग प्रसुती चिकित्सा,बालरोग, बिपि, शुगर, हृदयरोग तपासण्या डॉ विवेक चवारे,
डि.एन.जिवतोडे,डा पितांबर मस्के,डॉ मनेश भुसारी,डॉ मेघा चवारे,डॉ चेतन बुध्दे,आरोग्य सुफरवाझर सरकार आरोग्य सेविका वनिता चिलबुले,अजय शंभरकर यांनी केले.
यात अरततोंडी पळसगाव डोंगरगाव किनाळा मोहटोला उसेगाव फरी चिखली जोगी साखरा पाथरगोटा कोकडी शिवराजपुर येथील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.