राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आज . संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

43

दि16/10/2025

अहेरी: या निवेदनात नमूद करण्यात आले की, सन 2021 च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनंतर अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंच यांना माहे एप्रिल 2025 पर्यंत मानधन देण्यात आले आहे, मात्र ग्रामपंचायत सदस्यांना मासिक सभेच्या उपस्थिती भत्त्याचे वितरण अपूर्ण आहे.

काही ग्रामपंचायतींमध्ये केवळ 14 ते 18 महिन्यांचे भत्ते देण्यात आले असून, देवलमरी ग्रामपंचायतीत तर 2015 ते 2020 या कालावधीत केवळ 18 ते 22 महिन्यांचेच भत्ते वितरित करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मा. गणेश चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली असता त्यांनी अहेरी पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मासिक सभेचे भत्ते दिवाळीपूर्वी वितरित केले जातील, असे आश्वासन दिले.

या निवेदनावेळी उपस्थित होते:

श्रीनिवास विरगोनवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

सालय्या कंबलवार, ग्रामपंचायत सदस्या, देवलमरी

मधुकर चिलनकर, ग्रामपंचायत सदस्य, व्येंकटरावपेठ

सुमित मोतकुरवार, सामाजिक कार्यकर्ते

टाटाजी गेडाम, सामाजिक कार्यकर्ता