गडचिरोली:- दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिरु. डॉ. देवाजी तोफा, आदिवासी सेवक, गडचिरोली, आजी – माजी खासदार, आमदार, जनप्रतिनिधी, सर्व सामाजिक संघटना यांच्या नेतृत्वाखाली बंजारा, धनगराने आदिवासी आरक्षण मागणीच्या विरोधात आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने धडकला.
बंजारा,धनगर व ईतर गैरआदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नये, आदिवासींची जमिनी भाडेपट्यावर देण्यात आलेली घोषणा तात्काळ मागे घेण्यात यावे,अनुसूचित जात पडताळणी समिती गडचिरोली येथील अधिकारी/ कर्मचारी यांना इतरत्र न हलविणे तसेच समितीचे कामकाज चंद्रपूर समितीकडे न सोपविण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या महामोर्चात अ. भा.आ.वि. युवा परिषद, गडचिरोली चे पदाधिकारी सहभागी झाले. कुणालभाऊ कोवे, राकेश तोरे, बादल मडावी, रुपेश सलामे,गिरीश जोगे,केजिकराव आरके, संदीप तोरे, सुमित कुमरे, उत्तम कोवे, पराग कन्नाके, देवा कुमरे, आदित्य येरमे, विजय सुरपाम, राज डोंगरे, विकास कुसराम,आकाश कुळमेथे, साहिल शेडमाके यांच्यासह संघटनेचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.