अहेरी…
श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळ ची ४४ व्या वर्षाची परंपरा; अहेरीकरांचे डोळे पाणावले, दहा दिवस महाप्रसादाने भाविक तृप्त
अहेरी: संपूर्ण अहेरी नगरीला दहा दिवस भक्तिमय वातावरणात तल्लीन करून सोडणाऱ्या श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाच्या नवसाला पावणाऱ्या दुर्गा देवीला आज, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा मंडळाचे हे ४४ वे वर्ष होते, ज्यामुळे उत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. विसर्जन मिरवणुकीत देवीला निरोप देताना प्रत्येक अहेरीकराचे डोळे अक्षरशः नम झाले आणि संपूर्ण वातावरणात एक हळहळ निर्माण झाली होती.
मंडळाने यावर्षी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने देवीची स्थापना केली होती. दहा दिवस चाललेल्या या उत्सवात मंडळाच्यावतीने दररोज सकाळी ९ वाजता व सायंकाळी ७ वाजता संगीतमय आरती करण्यात आली. या आरत्यांना पार्श्वगायक अरुण आत्राम, अशोक आईंचवार आणि बोल्लु सर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने चार चांद लावले. वाद्यवृंदात अनिल तलांडे, अनंता आलाम आणि रमेश सिडाम, विशाल गणमुकुलवार यांनी उत्कृष्ट साथ दिली.
उत्कृष्ट संयोजन आणि महाप्रसादाची सोय
उत्सवाच्या दहाही दिवसांमध्ये मंडळाने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते, ज्यामुळे अनेक भाविक तृप्त झाले. या संपूर्ण आयोजनामध्ये मंडळाच्या सर्व सदस्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपले काम पार पाडले.
मंडळाची कार्यकारिणी:
श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार बुधाजी सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थापक सचिव मधुकर (बबलु) सडमेक, अध्यक्ष विलास सिडाम, उपाध्यक्ष अनंत आलाम, सचिव संजय आत्राम, सहसचिव अनिल तलांडे आणि प्रसिद्धी प्रमुख अशोक आईंचवार यांनी अत्यंत उत्कृष्ट संयोजन केले.
आजच्या विसर्जनाच्या वेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीला जड अंतःकरणाने निरोप दिला. ४४ वर्षांची ही भव्य परंपरा जपत, श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाने अत्यंत यशस्वीरीत्या हा उत्सव पार पाडला आणि आता सर्व अहेरीकर पुढील वर्षीच्या उत्सवासाठी उत्सुक आहेत.