महसूल सेवकांचे विविध मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण

227

एटापल्ली:
10 सप्टेंबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल सेवकांनी साखळी उपोषण केले होते; परंतु शासनातर्फे दखल न घेतल्याने येत्या ४ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण महसूल सेवकांनी पुकारले आहे.

ग्रामस्तरावर गेल्या ६० ते ७० वर्षापासून ईमानेइतबारे महसूल सेवक काम करीत आहे. तुटपुंज्या वाढीव मानधनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण
झाली आहे तेथे दिवस-रात्र महसूल सेवक आपली सेवा देत आहे.
चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, अन्यथा ४ ऑक्टोबरपासून विदर्भातील सर्व महसूल सेवक संविधान चौक, नागपूर येथे आमरण उपोषण पुकारतील, असा इशारा लेखी निवदेनाव्दारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भ महसूल सेवक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

*आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही* ४ ऑक्टोबरला संविधान चौक, नागपूर येथे होणाऱ्या महसूल सेवकांच्या आमरण उपोषणास एटापल्ली तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी उपस्थित राहावे.

अध्यक्ष
महसूल सेवक संघटना तालुका शाखा एटापल्ली जिल्हा गडचिरोली