*अहेरी* :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले आलापल्ली वासियांचे प्रॉपर्टी कार्डचे (मालकी हक्क)प्रश्न निकाली व मार्गी लागणार असून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना व पाठवपुराव्याला यश येत असल्याचे संकेत दिसत आहे.
गुरुवार 25 सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख नागपूरचे उपसंचालक लालसिंग मिसाळ अहेरी येथे दाखल होऊन अपीलार्थीचे सुनावणी घेतले. जवळपास 76 आपिलार्थी सुनावणीत हजर होते. सुनावणी दरम्यान लवकरच आलापल्ली वासियांचे प्रॉपर्टी कार्ड सबंधीचे निकाल निकाली काढण्याचे व प्रॉपर्टी कार्ड (मालकी हक्क) प्रदान करण्याचे भूमी अभिलेख उपसंचालक लालसिंग मिसाळ यांनी आश्वासन दिले.
यावेळी अहेरीचे भूमीअभिलेख उपअधीक्षक गुणवंत रणदिवे, आलापल्लीचे तलाठी एकनाथ टपाले, आलापल्लीचे वनपरिक्षेत्रधिकारि गौरव गणवीर, वनपाल पूनमचंद बुद्धावार, वनरक्षक हरीश दहागावकर आदी अधिकारी, कर्मचारी हजर होते.
*बॉक्स*
*तनुश्रीताई आत्राम व हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांचीही उपस्थिती*
आलापल्ली वासियांचे मागील अनेक वर्षापासूनची प्रॉपर्टी कार्ड प्राप्त व्हावे यासाठी आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम धडपड करीत असून त्यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार हे हिरहिरिने पुढाकार घेत आहेत.
अहेरी येथील सुनावणी दरम्यान सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, कैलास कोरेत यांच्या समवेत अपिलार्थी व असंख्य नागरिक आवर्जून उपस्थित होते.