दि.०३ मार्च २०२३
गडचिरोली:-देवरी येथील शिक्षण महर्षी झामसिंगजी येरणे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळासह मु.चिल्हाटी पोस्ट- ककोडी तालुका देवरी जिल्हा.गोंदिया या क्षेत्रातील जनतेच्या विविध समस्यांवर तसेच चिल्हाटी येथील समाज मंदिरा बाबत व जनतेच्या विविध समस्या बाबत, विविध विषयांवर आज खासदार अशोकजी नेते यांच्याशी विश्रामगृह गडचिरोली येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे चर्चा करण्यात आली.
त्यावेळी प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्या रेखाताई डोळ्स, शाहु समाजाचे अध्यक्ष फगवा हिरवानी,सचिव उत्तमदास कुवरदादरा, उपाध्यक्ष भगतदास गुरुपंच,रोजगार सेवक व बुथ प्रमुख लिलाधर गुरुपंच,पोलीस पाटील गुमानदास कुवरदादरा, भुवन कुवरदादरा, सोमदास
कुवरदादरा, सदस्य चेतनदास कुवरदादरा, ईमलाबाई बाडाबाग,धर्मेंद्र बनपेला, ठाकुरदास रणवाकडा,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.