अहेरी येथील आर्य वैश्य कोमटी समाजाचे बांधव श्री प्रवीण पुल्लूरवार हे महाराष्ट्र राज्य SET: 2025 या परीक्षेत शिक्षणशास्त्र उत्तीर्ण..

136

अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधी अहेरी

अहेरी. SET 2025 परीक्षेत शिक्षण शास्त्र या विषयात पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन असीस्टंट प्रोफेसर व PHD साठी क्वालीफाय झाल्याबद्दल अहेरी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.अहेरी सारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात शिक्षक म्हणून कार्य करत त्यांनी विपरीत परिस्थितीत उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.वयाच्या पन्नासाव्या वर्षी सेट परीक्षा पास होऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे.एक उपक्रमशील व आदर्श शिक्षक म्हणून त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2012मध्ये तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2014मध्ये तत्कालीन राष्ट्रपती मा.प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कृत करण्यात आले होते.एक आदर्श शिक्षकांसह ते उत्तम गायक,कला शिक्षक व उत्कृष्ट अध्यापक आहेत.एक उत्कृष्ट क्रीडा शिक्षक,स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक म्हणून या आधी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती झाली असून या पदावर कार्य करताना उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापनाबद्ल उपक्रमशील केंद्राला जिल्ह्यातील Cluster of Gadchiroli या पुरस्काराने मा.जिल्हाधिकारी व या.मुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आपल्या व्यवसायासोबतच आर्य वैश्य कोमटी समाजाच्या सर्व उपक्रमात सहभागी होतात .समाजात नवयुवक मंडळ व कार्यकारिणी तर सुद्धा त्यांनी कार्य केले आहे.आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाला 50वटवृक्ष लावून पर्यावरणप्रेमी देखील आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक असून संघाच्या संस्कारात विदर्भ वनवासी कल्याण आश्रमात शिक्षण घेतले आहेत . आपल्या यशाचे श्रेय आईवडील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सदोदित प्रेरणा व मार्गदर्शन करणारे आर्य वैश्य कोमटी समाजातील ज्येष्ठ मंडळी असल्याचे त्यांनी सांगितले.