प्रतिनिधी//
अहेरी:आज दिनांक ११/९/२०२५ ला भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर )माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी अहेरी तहसिलदार मा.बालाजी सोमवंशी साहेब,नायब तहसिलदार सुरपम मॅडम यांच्या कडे अहेरी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांना १) सनद पट्टे देण्यात यावे,२) श्रावण बाळ वृध्दपकाळ योजना,३) संजय गांधी निराधार योजना,४) नवीन रेशनकार्ड, प्राधान्य कुटुंबाचे, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्यात यावे असे निवेदन देण्यात आलं निवेदन दिल्या प्रकरणी मा.तहसिलदार सोमवंशी साहेब नायब तहसीलदार सुरपम मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वरील योजनांचे लाभ लवकरात लवकर मिळेल असे आश्वासन दिले या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेत्या विद्यामान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर )यांच्या सोबत श्रीनिवास विरगोनवार माजी तालुकाध्यक्ष, देवलमरी ग्राम पंचायत सदस्य सालय्या कंबलवार,नगरसेवक अमोल मुक्कावार, सुमित मोतकुरवार, अब्दुल रहेमान,स्वप्निल श्रीरामवार, राहूल दुर्गे, अमोल रामटेके उपस्थित होते