अहेरी
१० वर्षे सेवा पूर्ण कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन,दरवर्षी ८ टक्के मानधन वाढ,लोयल्टी बोनस अंमलबजावणी,सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ,ग्रॅज्युएटी,विमा संरक्षण लागू करणे,समुदाय आरोग्य अधिकारी यांचचे मानधन ४० हजार पर्यंत वाढविणे,कंत्राटी पदे नियमित करणे,वेतन सुसूत्रीकरण,बदली धोरण, हार्डशिप अलोवेन्स व पे प्रोटेक्शन लागू करणे व पूर्वीचे आंदोलनातील पोलिस प्रकरण बंद करणे या मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून आरोग्य कर्मचारी उपोषणाला बसले आहे त्यांच्या पूर्ण मागण्या रास्त असून त्यांच्या उपोषणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम पडत असून रुग्णांचे हाल होत आहे. दवाखाने,आरोग्य केंद्र,उपकेंद्र ओस पडले असून रुग्णांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे भाग्यश्री ताई आत्राम यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांना निवेदन पाठवून कर्मचाऱ्यांच्या पूर्ण मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.
यावेळी श्रीनिवास वीरजोनवार,नगरसेवक अमोल मुक्कावार,अब्दुल रहमान शेख,अक्षय येन्नमवार,सुमित मोतकुरवार,अरमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.