प्रतिनिधी//
एटापल्ली: आज पुन्हा एकदा *अडेंगे–नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला फसली*. प्रवासी घाबरून गेले, मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला. हा प्रकार नवीन नाही—सुरजागड–गट्टा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी *मृत्यूचा सापळा* बनला आहे.
सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज काढण्यासाठी सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना वेळ मिळतो, पण *स्थानिक जनतेच्या जीवाचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने काहीच नाही.*
🟥 *कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा तथा राज्य उपाध्यक्ष AIYF* म्हणाले –
“आमचा जीव धोक्यात, आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जात नाही, पण आमच्या जमिनीतील लोहखनिज मात्र सरकारला हवंच आहे. हा *जनतेच्या श्रम आणि जीवनावर केलेला खुला अन्याय* आहे. जनतेच्या जीवावर चालणारा हा विकास आम्ही सहन करणार नाही.”
गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. जनतेच्या संघर्षाशिवाय या रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
✊ *रस्ता द्या, विकास द्या – अन्यथा 15 सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर भाकपा तर्फे धरणे आंदोलन उभारले जाईल!*
—