यासह वासाळा, चामोर्शी माल परीसरातील वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे यामागण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणेगाव जुना फाट्यावर चक्काजाम आंदोलन
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांचा ईशारा
आरमोरी – गडचिरोली जिल्हातील आरमोरी तालुक्यातील वासाळा चामोर्शी माल, वनखी ठानेगाव डोगरगाव शिवणी, करपडा, लोहारा आणि इतर क्षेत्रातील शेतक-यांनी नदि नाल्यावर किंवा विहीर बोअरवेल जमिनीवर खोदुण उन्हाळी फसल धान मका लावलेला असुन काहीचे रोवणे चालु आहेत तर काहीचे धान व मका गर्भात असताना विज वितरण कंपनी लोडशेडींग सुर
करुन शेतकऱ्यांना फक्त आठच तास पाणी मिळत असल्याने तसेच शेतीला पाणी लावण्यासाठी रात्रीची वेळ असल्याने रात्री रात्री बारा वाजता शेतावर जाऊन पाणी देणे शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांचे धान मका पिक करपत असुन गेल्या दिनांक 06/03/ 2023 पासून या परीसरात वाघाची दहशत निर्माण झाल्यामुळे शेतक-यांना शेतावर जावून पाणी देणे शक्य होत नाही. त्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने
विज वितरण कंपनीने शेतक-याच्या कृषी पंपाना 24 तास विज पुरवठा करून वनविभागाने परीसरातील वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे यासह जंगलातील रान डुकराचा बंदोबस्त करुण डुकरानी नुकसान केलेल्या धान मका पिकाची भरपाई देण्यात यावे अन्यता दिनांक 13/03/2023 ला दुपारी १२ वाजता जुना ठाणेगाव फाट्यावर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात
असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यानी उपविभागीय अभियंता विज वितरण कंपनी आरमोरी व वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांना निवेदनातून दिला आहे.
यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती विनोद बावणकर राजु सामृतवार वामण निबोळ रामाजी मशाखैत्री भिमराव ढवळे विजु धारणे नानाजी लाकडे आदि उपस्थित होते.