नगर परिषद गडचिरोलीत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

62

गडचिरोली : नगर परिषद गडचिरोली येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. सूर्यकांत पिदुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले.

यावेळी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, रामपुरी येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर संगीतबद्ध कवायत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले.

कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. उपस्थितांनी मुख्याधिकार्‍यांचे अभिवादन स्वीकारले. सोहळ्यानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.