प्रतिनिधी
*माजी. पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांची अहेरी तहसील कार्यालयात धडक*
*अहेरी:*_मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्ते व अन्य रखडलेले कामे वेळीच मार्गी लावा आता हयगय व दुर्लक्षितपना खपवून घेणार नाही असे खडे बोल आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे सुपुत्र हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी सुनावले.
त्या गुरुवार 10 जुलै रोजी अहेरी तहसील कार्यालयात धडक दिले होते, यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी लगेच सबंधित विभागाचे अधिकारी, शाखा प्रमुख, कर्मचारी यांना पाचारण केले यावेळी माजी.पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी, अहेरी येथील प्राणहिता ते मुख्य चौक पर्यंतचा रस्ता त्वरीत बनविण्यात यावे, अहेरी ते महागाव रोड खराब झाले असून ते तात्काळ दुरुस्त करावे, राष्ट्रीय महामार्ग आष्टी ते लगाम, आलापल्ली आणि आलापल्ली ते सिरोंचा महामार्ग त्वरीत बनवावे, अहेरी येथील विद्युत समस्या सुरू असल्याने नव्याने उभारलेले व काम पूर्णतः झाल्याने 33 के.व्हि. तात्काळ सुरू करावे, अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात पदांची तात्काळ भरणा करून रुग्णालय तात्काळ सुरू करावे, गोर गरिबांसाठी स्मार्ट मीटर परवडण्यासारखे नसून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावे, शेतकऱ्यांचे व कृषी सबंधी योजनेचे लाभ शेतकऱ्यांना तात्काळ पुरविण्यात यावे असे विविध प्रश्न लावून धरले आणि आठवड्याभरापूर्वी सदरचे प्रश्न मार्गी लावण्याचे व पूर्ण करण्याचे विनंती वजा सूचना केले.
यावर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सुद्धा सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश करून कामात निष्काळजीपणा , दुर्लक्षित झाल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
यावेळी माजी.पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, राजेश्वर रंगुलवार, नगर सेविका ज्योती सडमेक, रतन दुर्गे, जावेद अली आदी मान्यवर उपस्थित होते.
*बॉक्स*
*स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध*
स्मार्ट मीटर हे गोर गरिबांसाठी परवडण्यासारखे नसून प्रीपेड स्मार्ट मीटर अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात बसविण्यात येऊ नये त्यासाठी आमचा कडाडून विरोध राहणार असल्याचे व स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये यासाठीचे निवेदन तहसीलदार तथा विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना यावेळी माजी.पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात निवेदन सोपविण्यात आले.