वर्षांतही पुल दुरुस्त नाही — ठेकेदाराच्या हलगर्जीपणातीनमुळे जनता त्रस्त! ग्रामपंचायत मानेवारा हद्दीत ठेकेदाराचा बेजबाबदार कारभार उघड गुडराम – भूमकाम दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता अजूनही धोकादायक

157

प्रतिनिधी

मानेवारा (ता. एटापल्ली), ९ जुलै २०२५ —
ग्रामपंचायत मानेवारा अंतर्गत येणाऱ्या गुडराम व भूमकाम या गावांच्या मधोमध PWD मार्फत सन 2023 साली बांधलेली पुलिया पहिल्याच पावसात वाहून गेली.

आज तीन वर्षे उलटून गेली तरी पुलाची दुरुस्ती नाही, गोटा पिचिंग नाही – फक्त आश्वासने!
या पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना धोका पत्करावा लागत आहे. लोकांचे जीव धोक्यात असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

हा मार्ग ‘कसनसूर – घोटसूर – गुडराम – भूमकाम ते बांदे (छत्तीसगड)’ या आंतरराज्यीय रस्त्याचा भाग असून, हजारो नागरिक रोज प्रवास करतात.

🔊 शिकायतकर्ता उपसरपंच देविदास मट्टामी यांनी प्रशासनाचा खरपूस समाचार घेत, ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
“पैसे घेऊन काम करायचं आणि तीन वर्षांनीही दुरुस्ती नाही? हा प्रकार थेट जनतेच्या जिवाशी खेळ आहे,” असा संतप्त सवाल त्यांनी केला.