प्रतिनिधी //
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देचलीपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली आणि जिल्ह्यात थैमान घातलेल्या मलेरिया परिस्थितीचा आढावा घेतला.
शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य व्यवस्था चांगली राहावी आणि प्रत्येक माणसाला योग्य आणि वेळेत उपचार मिळावा असे प्रयत्न करा असे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम डांगे तथा कर्मचाऱ्यांना केली. एका नुकत्याच प्रसूती झालेल्या एका महिलेची सुजाता अविनाश मडावी (गाव सिंधा) तथा तिच्या नवजात कन्येची पाहणी केली.
यावेळी उपस्थित डॉ शुभम डांगे, एल. टी. उइके आरोग्य सेविका, ममिता गावडे, स्वप्नील धुर्वे, मुकुंदा तेलम, मोहन दुर्ग, विनोद कुमरे, रुपेश करेनगुलवार, इस्माईल दादा, श्रीनिवास विरगोनवार, अफसर खान,सुमित मोतकुरवार यावेळी उपस्थित होते