भाग्यश्री ताईंच्या हस्ते जोश फाउंडेशन चॅरिटेबल रुग्णालय , जिमलगट्टा क्ष-किरण(X-Ray) मशीनचे उद्घाटन

142

प्रतिनिधी//

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा *भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर)* यांच्या हस्ते आज जोश फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रुग्णांच्या सेवेकरीता सुरू असलेल्या दवाखान्यात नव्याने आणण्यात आलेल्या क्ष-किरण(X-Ray) मशीन चे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संगीत मिडी (कांबळे) आणि मधुकर कांबळे यांच्या प्रयत्नाने
जिमलगट्टा परिसरात क्ष-किरण(X-Ray ) मशीन नसल्या कारणाने अनेक रुग्णांची गैरसोय होत होती,त्यांना अहेरी किंवा आलापल्ली जावे लागत होते मात्र आता हि गैरसोय टळणार आहे. यावेळी डा. वैभव वाकडे, हरीश दुर्गम, संतोष कांबळे, श्रीनिवास कुमरे, रवी येमुलवार, बानया कोडुरवार, विनोद कुमरे, मोहन दुर्गे, रजिता मेडी, सपना पानगणटीवार, श्रीनिवास विरगोनवार, इस्माईल दादा,अफसर खान, पूनम निष्टुरी, सुमित मोतकुरवार, यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.