एटापल्ली शहरातील अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना तातडीने राबवा — नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व राहुल कुळमेथे यांची मागणी

153

एटापल्ली, 1 जुलै (प्रतिनिधी) —
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात तातडीने सुरू करण्यात यावी, अशी लेखी मागणी नगरसेवक राघवेंद्र राजगोपाल सुल्वावार व नगरसेवक राहुल देऊ कुळमेथे यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ग्रामीण अंगणवाड्यांमध्ये सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेद्वारे अंगणवाडीतील लाभार्थी बालकांना पोषणयुक्त आहार पुरवण्यात येतो. तथापि, नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये ही योजना अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातीलही अंगणवाड्यांमध्ये सदर योजनेची तातडीने अंमलबजावणी करून येथील बालकांना पोषण आहाराचा लाभ मिळावा, अशी मागणी नगरसेवकांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. शासनाने 444 प्रकल्पांमध्ये ही योजना मंजूर केली असून एटापल्ली शहरही त्यात समाविष्ट आहे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी अंगणवाडी सेविका सर्वश्री वछला तलांडे, लता कोकुलवार, छाया रामटेके, सुवर्णा फुलमाळी, प्रेमीला ओल्लालवार, राजश्री खोब्रागडे, गुलशनबानो शेख, कविता मूलमुले, सुमन गावडे, हंसमाला कुंभारे, कौतूका रामटेके, अनुसया झाडे, करुणा मडावी उपस्तीत होते.