प्रतिनिधी//
दिनांक 27/06/2025 *एटापल्ली* – तालुक्यातील भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविदयालय , एटापल्ली येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत गावातुन बॅन्ड पथकाच्या गजरात नवागत विदयार्थ्याचे प्रभात फेरी व्दारे पुष्पगुच्छ देउून स्वागत करण्यात आले .याप्रसंगी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख, नगर पंचायत ,एटापल्लीच्या नगराध्यक्षा सौ. दिपयंतीजी पेंदाम ,एस.एच.हिवाळे गृहपाल ए.आ.वि.प्र.भामरागड कार्यालय प्रतिनिधी ,निजानजी पेंदाम नगरसेवक , संभाजी हिचामी पालक प्रतिनिधी ,सदूजी हिचामी पो.पाटील ,भगवंतराव कला विज्ञान महा.एटापल्ली प्रा. सुधिरजी भगत उपस्थीत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य धनंजय पोटदुखे यांनी भुषविले . या कार्यक्रमाअंतर्गत मान्यवरच्या उपस्थीत मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले. नवागत विदयार्थ्याचे पुष्पगुच्छ व पाठयपुस्तक देउुन मान्यवराच्या हस्ते स्वागत करण्यात आले . यानंतर वर्ग 12 चे गुणवंत विदयार्थी कु. सानिया शेख,वेदांत भांडेकर,स्वप्नील गोटा,कु.तप्ती आत्राम व वर्ग 10 चे गुणवंत विदयार्थी रोहीत लेकामी , प्रितम पोई यांचा शिल्ड व पुष्पगुच्छ देउून सत्कार करण्यात आला.सोबत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सलग दोन वेळा प्रथम क्रमांक पटकविलेल्या विदयार्थीनी मोनिका मडावी विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हस्तकला प्रदर्शनी आयोजन केली होती.या कार्यक्रमात मान्यवरानी विदयार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले . प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शाळेत वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन सौ.सविता पोटदुखे व घोंगडे सर यांनी केले आणि पाहूण्याचे आभार सौ.ममता झिलपे यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता विदयार्थ्याना ,उपस्थित पाहुणे व पालक वर्ग मिष्ठान भोजन देउून करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले .