*अहेरी:*- तालुक्यातील बोरी नजीकच्या शिवणीपाठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जून राजर्षी शाहू महाराज जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम होते. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मीनाताई वेलादी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनमंतु कुळमेथे, माजी सरपंच मधुकर वेलादी, बोरी ग्राम पंचायतीचे उपसरपंच पराग ओलाल्लवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, अखिल कोलपाकवार, जावेद अली, विजय कोकीरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथमतः हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सुरेंद्र अलोणे, अखिल कोलपाकवार यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या ऐतिहासिक जिवन कार्यावर प्रकाश टाकले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रवि येमसलवार यांनी तर संचालन सुरेखा मेश्राम यांनी केले.
तद्नंतर शाळेच्या आवारात विविध प्रजातीचे वृक्षाचे अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी , गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.