नगरपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप वासराची बडी… दि. २० जून २०२५ रोजी झालेल्या गोवंश मृत्यु प्रकरणी चौकशी करून दोषींविरोधात गुन्हा दाखल करा

68

प्रतिनिधी//

एटापल्ली नगरपंचायत हद्दीतून मुख्य रहदारीचा रस्त्यांवरील फिरत असलेल्या मोकाट जनावरांचे बंदोबस्त करण्यासंदर्भात अनेकवेळा नगरपंचायत कार्यालयाला तोंडी व लेखी स्वरुपात माहिती देऊन सुद्धा सदर गंभीर बाबींकडे नगरपंचायत प्रशासनाने कोणतेही ठोस कार्यवाही करतांना दिसून येत नाही परिणामी दि. २० जून २०२५ रोजी बसस्थानका समोर एका मादी प्रजातीच्या गायीचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यु झाला असून सदर घटनेमुळे सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व हिंदू संघटनांचे मने दुखावले असून सदर बाब ही गंभीर स्वरुपाची आहे करीता सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर स्वदोष गोवंश हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच येत्या ३ दिवसांत मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा असे न झाल्यास ४ थ्या दिवशी संपूर्ण मोकाट जनावरे नगरपंचायत कार्यालयात साठवण्यात येईल व आंदोलन करण्यात येईल. सदर आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी श्री. अक्षय पुंगाटी तालुका प्रमुख, प्रशांत तलांडे तालुका समन्वयक, राजश्री ताई जांभूळकर शहर संघटिका, विनोद मडावी विभाग प्रमुख, महादेव हिरा तालुका संघटक, विशाल मेश्राम शाखा प्रमुख, रुषभ दुर्गे शाखा प्रमुख, नागराज पंचार्य, रोहित कासवटे आदी सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.