वनपरिक्षेत्रात चालतंय तरी काय ? सर्वात मोठा प्रश्न

196

गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी वनपरिक्षेत्रातून वन्यप्राणी वावर वन क्षेत्रातून तसेच वनपट्ट्याच्या जमिनीवरून रात्रोच्या वेळी उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ३३ हायव्हा व ३ पोकलेन श्रीकृष्ण वाघाडे यांच्या समक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.बडोले व वनरक्षक पाटील यांनी केला. रात्री गाड्या जप्ती न करता सकाळी संपूर्ण गाड्या जप्ती करण्यात येथील असे सांगितले परंतु आज पावतो कुठल्याही गाड्या जप्ती करण्यात आलेल्या नाही. जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीवर वनगुन्हा दाखल करण्यात यावी व वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी आर्थिक हेतुपोटी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
तसेच त्याप्रमाणे पोर्ला वनपरीक्षेत्रातून पोर्ला गावातील कुंभारबोडीचा सर्वे क्रमांक 221 ह्या संपूर्ण वन जमिनीतून मुरूम उत्खनन करून वन क्षेत्रातील तार तार कंपाऊंड तोडून या क्षेत्रातून मुरूम वाहतूक केले हे प्रत्यक्ष दर्शनी दिसताना सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संजय मेहर व क्षेत्र सहाय्यक श्री अरुण गेडाम यांनी आर्थिक हेतुपोटी यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संजय मेहेर व क्षेत्र सहाय्यक श्री अरुण गेडाम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
मार्कंडा(कं) व पेडीगुडाम वनपरिक्षेत्रातून करोडो रुपयाचे अवैद्य सागवान तोडल्याने संपूर्ण वृक्षतोड प्रथमदर्शनी दिसत असताना सुद्धा त्या परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी ,क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली वनवृत्त यांच्या कार्यालयासमोर ह्या संपूर्ण मागण्या घेऊन आज पासून श्री. श्रीकृष्णा वाघाडे, श्री शंकर ढोलगे, श्री रवींद्र सेलोटे, श्री. विलास भानारकर, श्री प्रवीण ठाकरे बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहेत.