आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते अहेरी शहरात विविध विकास कामांचे शुभारंभ अहेरी -वांगेपल्ली ॲप्रोच रोडचे लोकार्पण

16

विकास कामांचा धडाका

*अहेरी*:-शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
15 जून रविवार रोजी राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करून विकास कामांचे धडाका लावले.
या प्रसंगी अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, सुरेंद्र अलोणे, इशाक शेख, जावेद अली, नगर सेवक विलास सिडाम, नगर सेविका नौरास शेख, ज्योती सडमेक , अजय सडमेक, पितांबर कुळमेथे, योगेश दंडिकवार, आदित्य पुसलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथमतः अहेरी वांगेपली ॲप्रोच रोडचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकार्पण केले, त्या नंतर तेलंगणा राज्याला जोडणारा तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरील वांगेपली येथे गेरा फाट्याला जोडणारा बायपास रोडचे भूमिपूजन केले.
तसेच अहेरी नगर पंचायत अंतर्गत प्रभू सदन कॉलनीतील सी. सी. रोडचे, लोहार समाजाचे समाज मंदिर, बेघर कॉलनीतील समाज मंदिराचे भूमिपजून केले.
प्रामुख्याने पॉवर हाऊस कॉलनी येथे आदिवासी समाजाचे समाज मंदिराचे लोकार्पण केले.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

*बॉक्स*
*झाडे लावा झाडे जगवा, संदेशही दिले!*
अहेरी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या दरम्यान अहेरी शहरातील चर्च परिसरात आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते विविध प्रजाती रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन हे प्राणवायू लागते. ऑक्सिजन झाडांपासून मिळत असते त्यामुळे प्रत्येकानी झाडे लावून झाडे जगवावे , आणि पर्यावरणाचा समतोल राखावे असा संदेश दिले.