राजाराम नगरी रामनाम गजराने दुमदुमली
गुड्डीगुडम :- श्री राम जन्मोत्सव समिती व बजरंग स्वामी मंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून राजाराम येथे भव्य दिव्य श्रीराम नवमी कार्यक्रम पार पडला आहे.
राजाराम येथील हनुमान मंदिराच्या आवारात श्री राम नवमी कार्यक्रम आयोजित करून श्रीराम व सीतामाई यांच्या पूर्णाकृती मुर्तीचे पूजन नारायण कंबगौनीवार व जयश्री कंबगौनीवार या दाम्पत्याचे हस्ते विधिवत मंत्रोच्चार पद्धतीने पूजन करण्यात आले. यावेळी भगवे ध्वज,भगवे तोरण,रोषणाई लावून ढोल ताशांच्या साहाय्याने राम नामाचा गजराने शोभायात्रा काढण्यात आले आणि महा प्रसादाचे वितरण करण्यात आले.राम नवमी कार्यक्रम यशस्वीतेकरिता
उत्सव समितीचे अरविंदस्वामी परकिवार, सर्व श्री स्वामी मंडळ सुरेश मोतकूरवार,सुरेश पेंदाम, नामदेव पेंदाम, राजू
कंबगौनिवार, उमाजी दुर्गे,प्रमोद बामनकर,लक्ष्मण बामनकर,सुधाकर कंबगौनीवार,प्रमोद केकर्लावार,व्येंकटेश शालीग्राम,अनिरूध्द मोतकुरवार बजरंग दल अध्यक्ष रोशन कंबगौनीवार, पंकज पेंदाम, ओमप्रकाश कंबगौनीवार,मयूर परकिवार आदी सहकार्य केले.