नैताला गावात विवाह सोहळा — भाकपा नेत्यांची प्रमुख उपस्थिती

20

नैताला गावात बारसु उईके व अनिल गोटा यांच्या मुला-मुलीचा विवाह सोहळा आनंदात पार पडला. या कार्यक्रमाला भाकपा अहेरी विधानसभा प्रमुख कॉ. सचिन मोतकुरवार यांनी भेट देऊन नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी रेकलमेट्टा येथील पाटील महादू कवडो, कोईनवर्षीचे पाटील सत्तू हेडो, रमेश कवडो, कुल्ले कोकसा, रामलू कोकसा आणि भाकपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरज जक्कुलवार उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते….