छल्लेवाडा पोस्ट खात्यातील कर्मचारी विविध योजनेची माहिती देताना #jantechaawaaz#news#portal#

114

अहेरी तालुक्यातील कमलापूर उप डाक कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा ब्रांच ऑफिस हद्दीतील गावागावात जाऊन डाक विभागातील विविध योजनेबद्दल छल्लेवाडा येथील ब्रांच पोस्ट मास्टर सुधाकर गदलपल्लीवार यांनी माहिती देण्यात आले आहे.
अति दुर्गम प्रदेशातील स्थानिक नागरिकांना शासकीय योजनांचा अनुभव घेता यावा आणि बँक व्यवहार करणे सोयीस्कर व्हावे तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणून भारतीय डाक विभाग द्वारे राबवल्या जाणाऱ्या मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ भेटावे म्हणून सुकन्या समृद्धी योजना, दर महा बचत राहावी म्हणून आवर्ती ठेव योजना, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी 
बचत खाते, भविष्याचा विचार केंद्र स्थानी ठेवून ग्रामीण डाक विमा योजना, तसेच प्रसिद्ध ३९९ रुपये मधील अपघात विमा योजना या योजना ची माहिती देऊन सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला या मध्ये नागरिकां द्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी डाक विभागाचे अधिकारी श्री. सुभाष जावडे ,श्री. प्रशांत पाटील,पोस्टमास्टर श्री. सुधाकर गदलपल्लीवार यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि सौरभ मांगळुरकर,निखिल साळवे,अभिषेक मोरे,सौरभ शिकारे,ज्ञानेश्वर धुलगंडे,सानिका सुतार,रुपाली आंबेडकर,संध्या शेवाळे यांचे सहकार्य मिळाले.