गडचिरोली: शिवलींग हनुमान नाटय कला मंडळ,फुले वार्ड नं. २ माळी मोहल्ला ता.जि.गडचि रोली यांच्या सौजन्याने….आज दिनांक: ०२ एप्रील २०२३ ला एकता नाटय रंगभूमी वडसा निर्मीत संगीत:- थैमान या नाटय प्रयोगाला आयोजित उद्घाटक
मा.खासदार अशोकजी नेते हे होते.परंतु दिल्ली येथे अधिवेशन चालु असल्याकारणाने आज सायंकाळी जावे लागले तरी पण हजर न राहु शकल्याने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नाटय रसिकांची उत्सुकता बघता खासदार महोदयांनी भ्रमणध्वनी वरून नाट्य रसिकांना संबोधित करतांना गडचिरोली जिल्हा हा झाडीपट्टी कलागुणांनी अवगत आहे.
नाटय प्रयोगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य घडत असते.या माध्यमातून चांगले गुण अवगत केले पाहिजे.वाईट,दुर्गुण सोडून चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केला.या निमित्ताने नाट्य रसिकांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नाटकाचा चांगला आस्वाद घ्यावा व कलागुणांना चांगला वाव द्यावा असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी नाटय प्रयोगाच्या या प्रसंगी केले.
याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे,भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी सभापती केशवजी निंबोड,माजी सभापती वैष्णवीताई नैताम,माजी नगरसेवक सुनिल बावणे,प्रत्रकार बंधू सुनिल कावळे, भाजपाचे जेष्ठ
श्याम वाढई, विजय कावळे,संतोषभाऊ मारगुनवार,दिपक मडके,दामोधर लटारे,विलास नैताम तसेच मोठ्या संख्येने नाटय रसिक बंधू आणि भगिनीं उपस्थितीत होते.